राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी सहज सोप्यापद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी ‘श्रम विद्या शैक्षणिक’ कर्ज ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत मुला-मुलींना पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी तसेच, पाच ते दहा लाखांपर्यंत दोन टक्के आणि दहा ते पंधरा लाखांपर्यंत चार टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व राज्यातील सहकारी बँकेच्या सहाय्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना राज्यात सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत लवकरच शून्य टक्के व्याजदराने सहकारी बँकेच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षणासाठी कर्ज देण्यात येईल.
लाभ कोणाला मिळणार ?
श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ 2023 पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळणार आहे. ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी 12वी उत्तीर्ण झाला असेल, तर पुढील पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
योजनेचे वैशिष्ट्ये
- कर्जासाठी तारण आणि प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार नाही.
● पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल.
● 90 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाखापर्यंतचे पारितोषिक बक्षीस देण्यात येईल.
● 5 लाखापर्यंतचे कर्ज – 0% व्याजदर
● 5 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज – 2% व्याजदर
● 10 ते 15 लाखापर्यंतचे कर्ज – 4% व्याजदर
अर्ज कसा करता येईल ?
अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सहकारी बँकेत माहिती घेऊ शकता तसेच अर्ज देखील करू शकता
श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा
● बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका
● महाविद्यालय / विद्यापीठातील पुढील प्रवेश घेतल्याचा पुरावा
● शैक्षणिक शुल्क विवरण पत्रक
● शेतकरी पित्याच्या आत्महत्येबाबत तहसिलदारांचा दाखला / पोलीस पंचनामा / जिल्हाधिकारी कमिटीने मंजूर केलेली आत्महत्याग्रस्त शेतकयांची यादी, सरपंच /ग्रामसेवक / पोलीसपाटील यांचा दाखला.
● एकल माता असल्याची नोंद
● वार्षिक उत्पन्नाचा दाखला
● आई व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
● आई व विद्यार्थ्याचे पैन कार्ड
● इलेक्ट्रिक बिल इत्यादी