HDFC बँक ECSS परिवर्तनचा 2023-24 हा कार्यक्रम राबवत आहे. ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि जे डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, UG आणि PG या सर्वांसाठी आहे.

ECSS कार्यक्रमांतर्गत, जे विद्यार्थी वैयक्तिक/कौटुंबिक संकटांमुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी 75,000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

पात्रता

● विद्यार्थी सध्या इयत्ता 1 ते 12वी, डिप्लोमा, ITI, किंवा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असला पाहिजेत.
● अर्जदारांनी मागील पात्रता परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
● वार्षिक कौटुंबिक उत्पन्न INR 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.

कशी मिळेल रक्कम

● इयत्ता 1 ते 6 साठी – 15,000 रुपये
● इयत्ता 7 ते 12, डिप्लोमा, ITI, आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी – 18,000 रुपये
● सामान्य पदवी अभ्यासक्रमांसाठी – 30,000 रुपये
● व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी – 50,000 रुपये
● सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी – 35,000 रुपये
● व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी – 75,000 रुपये

आवश्यक कागदपत्रे

● पासपोर्ट फोटो
● मागील वर्षाच्या मार्कशीट (२०२२-२३)
● आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स
● चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र) (२०२३-२४)
● बँकेचे पासबुक
● उत्पन्नाचा दाखला
● प्रतिज्ञापत्र
● कौटुंबिक/वैयक्तिक संकटाचा पुरावा

अर्ज करण्यासाठी –

● सर्वप्रथम www.buddy4study.com या वेबसाईटवर जा. येथे तुमच्या ईमेल/मोबाइल/Gmail खात्यासह नोंदणी करा.

● त्यानंतर होम पेजवरील scholarship या पर्यावर क्लिक करा. नंतर उजव्या बाजूला Featured Scholarships मधून ‘HDFC Bank Parivartan’s ECSS Programme’ या पर्यायावर क्लिक करा.

● नंतर ‘Apply Now’ बटणावर क्लिक करून ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.

● संबंधित कागदपत्रे अपलोड करा ‘अटी आणि नियम’ स्वीकारा आणि ‘पूर्वावलोकन’ वर क्लिक करा.

● अर्जामध्ये भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर योग्यरित्या दिसत असल्यास, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *