रेल्वे विभागात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी भारतीय रेल्वे विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे विभागात मोठ्या प्रमाणावर मेगा भरती होणार अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यानुसार, रेल्वेच्या सर्वच विभागात सर्वच पदासाठी मेगा भरती होणार आहे.

यामध्ये सेफ्टी स्टॉफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी हि मेगा भरती होईल. त्यासाठी लवकरच रेल्वेने भरतीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे.

किती पदांची होणार मेगा भरती

भारतीय रेल्वेच्या सर्वच विभागात ग्रृप सी अंतर्गत 2,48,895 पद रिक्त आहेत. तर गृप ए आणि बी ची एकूण 2,070 पद रिक्त आहेत. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, एकूण 2.4 लाख पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

यामध्ये सेफ्टी स्टॉफ, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी, तिकीट कलेक्टर अशा पदासाठी हि भरती होईल. या पदांना दोन मुख्य गटात विभाजीत करण्यात आले आहे. यामध्ये गॅझेटेड ग्रुप ‘ए’ आणि ‘बी’ पदांचा समावेश आहे. तर नॉन-गॅझिटेड पदांमध्ये ग्रुप ‘सी’ आणि ‘डी’ या पदांचा समावेश आहे.

या पदासाठी अर्ज कसा करायचा

● सर्वप्रथम भारतीय रेल्वेच्या indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जा.
● तुमचे राज्य, विभागाचा पर्याय निवडा.
● त्यांनतर कोणता खास विभाग, डिपार्टमेंट हवे आहे, याची निवड करा.
● नंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पर्याय निवडा. तो व्यवस्थित भरा.
● रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक आहे.
● त्यांनतर फॉर्मसाठी लागणारे शुल्क भरा आणि सब्मिट बटणावर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *