सर्व शेतकरी बांधवांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या दृष्टीनं चिंतेचे असणार आहेत. कारण संपूर्ण राज्यभरात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा सविस्तर अंदाज देखील जाहीर केला आहे.

पहा कशी असणार पुढील 5 दिवस हवामान स्थिती

२३ जुलै : –

२३ जुलैला पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, नगर, जालना, संभाजीनगर, नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे इथं सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर बुलडाणा, परभणी, नांदेड हे जिल्हे वगळता संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२४ जुलै : –

२४ जुलैला रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. तर मुंबई, नाशिक, पुणे, बुलडाणा, परभणी आणि नांदेडसह उर्वरित संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२५ जुलै : –

२५ जुलैला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, सोलापूर आणि धाराशीव या जिल्ह्यांना कुठलाही इशारा नाही पण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वित विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२६ जुलै : –

२६ जुलैला कोकण किनारपट्टीवरील तीन जिल्हे तसेच सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मिळून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, पुण्यासह संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पाऊस राहिल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *