सर्व शेतकरी बांधवांसाठी हि बातमी खूप आनंदाची आहे कारण खरीप पीक विमा 2023 च्या अंतर्गत, 16 जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची उर्वरित ७५ टक्के रक्कम आजपासून खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज आपण कोणत्या जिल्ह्यांत ? कोणत्या मंडळात ? पीक विम्याचे संरक्षण केले जाईल, याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
या जिल्ह्यांना मिळणार सर्वात आधी पीकविमा
कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी उर्वरित 75 टक्के पीक विम्याची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून यामध्ये अहमदनगर, यवतमाळ, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, अमरावती, नांदेड, संभाजीनगर, सोलापूर, जळगाव, वाशीम, बुलढाणा, अकोला आणि वर्धा हे जिल्हे पात्र झाले आहेत.
तुम्हाला माहिती असेल, काही शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पीक विमा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा दावा केला होता आणि घेतला होता अशा शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमाही मिळणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी दावा केला नाही, अशा शेतकऱ्यांनादेखील आता उर्वरित पीक विमा मिळणार आहे.
पीक विम्याची यादी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
असे तपासा पीक विम्याच्या यादीत आपले नाव
तुम्हाला पीएम फसल विमा योजनेच्या यादीत तुमचे नाव पाहायचे असेल तर आम्ही तुम्हाला सोपा मार्ग सांगणार आहोत. याद्वारे तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळेल की नाही हे कळू शकेल.
▪️ सर्वप्रथम, तुम्हाला पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
▪️ त्यांनतर होम पेजवर तुम्हाला Application Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
▪️ आता पुढचे पान तुमच्या समोर उघडेल. यामध्ये तुम्हाला पावती क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
▪️ यानंतर चेक स्टेटस पर्यायावर क्लिक करा, आता तुमच्यासमोर पीक विम्याची स्थिती उघडेल.
या उघडलेल्या यादीत तुम्ही तुमचे नाव पाहू शकता.
▪️ जर तुमचे नाव या योजनेच्या यादीत असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पीक विम्याची स्थिती सहज तपासू शकता.