तुम्हाला माहिती असेल, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत साडेतीन लाखांपर्यंत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत दीड लाखांपर्यंत असे एकूण पाच लाखापर्यंत आपल्याला मोफत उपचार घेता येतो. मात्र, यासाठी आपल्याकडे आयुष्मान कार्ड असणे अनिर्वाय आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील ३६ जिल्ह्यांत ७८ लाख १३ हजार ३१४ जणांना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जवळपास १ हजार २०९ आजारांवरती मोफत उपचार केले जातात. दरम्यान या कार्डसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता.

ज्या नागरीकांकडे रेशन कार्ड आहे अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान अर्ज कसा करायचा ? आणि कुठं करायचा ? हे आपण या मॅसेज मध्ये सविस्तर जाणून घेऊ – तसेच यासाठी कुठले कागदपत्रे लागतील ? ते देखील आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.

या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला एक कार्ड दिले जाते ज्याला ‘आयुष्मान कार्ड’ असे म्हणतात याद्वारे प्रत्येक नागरिकाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जातो.

कुठं काढता येईल आयुष्मान कार्ड ?

आयुष्मान भारत योजनेचे इ कार्ड काढण्यासाठी आपल्याला जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल – अर्ज करण्यासाठी आपल्याला आधारकार्ड याशिवाय काही आणखी महत्वाचे कागदपत्रे द्यावे लागतील. अर्ज केल्यानंतर पोस्ट द्वारे हे कार्ड आपल्याला घरपोच मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *