येत्या 4 दिवसात राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तर पुढील 4 दिवस विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठं पडणार पाऊस ?
१७ जुलैला – पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि विदर्भातीस सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तर,
18 आणि 19 जुलै रोजी – पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबईमध्येही 17 जुलैपासून 19 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.