सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला माहिती असेल, गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ सुरू होती. पण, आता सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोमवारी सोन्याचे दर 142 रुपयांनी घसरून ५८ हजार रुपयांवर पोहोचले होते.

तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीची किंमत 209 रुपयांनी स्वस्त झाली असून चांदी 71101 रुपये प्रति किलो झाली होती. मात्र आज संध्याकाळी चांदीचे दर सारखे होवून पुन्हा १०० रुपयांनी वाढ झाली आहे – त्यामुळे चांदी आता 73,400 रुपये प्रति किलो झाली आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी कमी होऊन 54,450 रुपये प्रति तोळा इतके झाले आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 59,410 रुपये प्रति तोळा इतके झाले आहे. सोन्याच्या दागिन्यांची महत्वाची बाजारपेठ असलेल्या जळगाव येथील सराफा बाजारातही 22 कॅरेट सोन्याचे दर 54,040 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 59,000 रुपये प्रति तोळा इतके झाले आहे.

पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर

▪️ मुंबई, २२ कॅरेट सोना : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोना : ५९४१० रुपये
▪️ पुणे, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
▪️ औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
▪️ नागपूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
▪️ भिवंडी, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
▪️ नाशिक, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४४० रुपये
▪️ कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
▪️ लातूर, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४४० रुपये
▪️ सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
▪️ ठाणे, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
▪️ वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४४० रुपये

आता घरबसल्या पाहता येतील सोन्याचे भाव

आता सोन्या-चांदीचे दर तुम्ही घरी बसूनही जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. मिस्ड दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर संदेशाद्वारे सोन्या-चांदीचे नवीनतम दर मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *