तुम्हाला माहिती असेल, अनेक राज्य सरकारांनी मुलींसाठी विशेष योजना सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटक पाठोपाठ त्रिपुराचे अर्थमंत्री प्रणजित सिंह रॉय यांनीही 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

यामध्ये त्यांनी त्रिपुरातील मुलींसाठी एक खास योजना काढली आहे. चला जाणून घेऊया त्रिपुरा सरकारने मुलींसाठी कोणती नवीन योजना आणली आहे. तसेच कोणत्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार त्याविषयी सुद्धा आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.

या मुलींना मिळणार मोफत स्कुटर

त्रिपुरा सरकारने 12वी मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या 100 मुलींना सरकारकडून स्कूटी देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ‘मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना’ सुरू करण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करताना रॉय म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था आठ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या धर्तीवर आरोग्य विमा योजना ‘मुख्यमंत्री जन आरोग्य योजना-2023’ (CM-JAY) सुरू करण्यात येईल.

या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ देण्यात येणार. या योजनेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात येईल – तसेच या योजनेसाठी सरकार दरवर्षी सुमारे 589 कोटी रुपये खर्च करणार आहे, ज्यामाध्यमातून राज्यातील 4.75 कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *