इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आय आर सी टी सी यांच्या अंतर्गत ‘अप्रेंटिस’ ट्रेनिंग म्हणजेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅम असिस्टंट या पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. विशेष म्हणजे या भरतीमध्ये कुठलीही लेखी परीक्षा तसेच मुलाखत सुद्धा द्यायची गरज नाही.
मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कुठलीही लेखी परीक्षा द्यायची गरज नाही तसेच मुलाखत सुद्धा द्यायची गरज मग या भरतीचे सिलेक्शन होणार कसे ? तर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार हे आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.
पहा कसे होणार सिलेक्शन
उमेदवारांची निवड ही त्यांच्या टक्केवारीच्या आधारावर केली जाणार आहे म्हणजेच तुम्हाला दहावीला किंवा बारावीला जास्त टक्केवारी असेल तर तुमची निवड केली जाऊ शकते. त्यामुळे कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत किंवा तोंडी परीक्षा यामध्ये होणार नाही.
वयाचीअट व शिक्षण पात्रता
अर्जदार हा फक्त 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि कोपा ट्रेड मध्ये NCVT शी संलग्न आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे – उमेदवाराचे वय १५ वर्षे पूर्ण असावे, मात्र २५ वर्षा पेक्षा जास्त नसावे. आरक्षण उमेदवारांना यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख किती असणार ? तसेच वेतनमान किती असणार ? याविषयीची सर्व माहिती जाहिरातमध्ये दिलेली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता तसेच या भरतीची अधिकृत जाहिरात देखील पाहू शकता.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी – 👉 इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – 👉 इथे क्लिक करा