सोलर पॅनलचा व्यवसाय सुरू करा आणि महिन्याला 1 ते 2 लाख रुपये कमवा ! सरकारकडून सबसिडी मिळवण्यासाठी येथे करा लगेच अर्ज

आज आम्ही तुम्हाला अशा बिझनेस आयडिया बद्दल सांगणार आहे. जिथे तुम्ही तुमच्या घरातील रिकाम्या छताचा वापर करून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता

देशभरातील ऊर्जेच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने 2030 पर्यंत 40 टक्के वीज निर्मिती आणि 100 GW अतिरिक्त वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी लोकांच्या घरच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार असून यासाठी केंद्र सरकारकडून सबसिडी देखील देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही देखील या योजनेचा फायदा घेऊन महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.

या योजनेअंतर्गत तुम्हाला केंद्र सरकार व्यतिरिक्त, राज्य सरकारकडून देखील सबसिडी मिळणार आहे. सौर पॅनेलचा फायदा असा आहे कि, सौर पॅनेलचे आयुष्य 25 वर्षे असते. तुम्ही हे पॅनल तुमच्या छतावर सहज स्थापित करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला वीज मोफत मिळणार आहे.

यासोबतच उर्वरित वीजही ग्रीडद्वारे सरकार किंवा कंपनीला विकता येणार आहे. म्हणजे मोफत कमाई. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 2 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल लावले तर दिवसातील 10 तास सूर्यप्रकाश पडल्यास ते सुमारे 10 युनिट वीज निर्माण करेल. एका महिन्याचा हिशोब केला तर दोन किलोवॅट सोलर पॅनलमधून सुमारे 300 युनिट वीज तयार होईल

किती येईल खर्च ?

केवळ ६० ते ७० हजार रुपयांमध्ये एक किलोवॅटचा सोलर प्लांट बसतो. विशेष बाब म्हणजे सौरऊर्जेशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांच्या एसएमई शाखेतून यासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकते. सोलर पॅनलच्या देखभालीमध्ये विशेष अडचण येत नाही. त्याची बॅटरी दर 10 वर्षांनी बदलावी लागते. त्याची किंमत सुमारे 20,000 रुपये आहे.

किती मिळेल अनुदान ?

जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 3 किलोवॅटचे सोलर पॅनल लावले तर. या योजनेअंतर्गत, तुम्हाला सौर पॅनेल बसविण्यासाठी 40% सरकारी अनुदान मिळेल, तर तुम्ही 3KW आणि 10KW आकाराचे सोलर पॅनल लावल्यास, सरकार 20% पर्यंत अनुदान देईल.

कमाई किती होईल ?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीची गुंतवणूक खूपच कमी आहे. पण तुमच्याकडे पैसे नसले तरी अनेक बँका त्यासाठी वित्तपुरवठा करतात. यासाठी तुम्ही सौर अनुदान योजना, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर योजनेअंतर्गत बँकेकडून SME कर्ज घेऊ शकता. या व्यवसायमध्ये तुम्ही एका महिन्यात 30,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत सहज कमवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *