टीव्हीवरील प्रसिद्ध आणि वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस’ ओटीटी सीझन २ ला आजपासून सुरूवात झाली असून या सीझनमध्ये अनेक हटके गेम्स पाहायला मिळणार आहेत. या शोचा होस्ट सलमान खानने धमाकेदार डान्स करत मंचावर एन्ट्री केली.

दरम्यान या शोमध्ये कोण कोण स्पर्धक आहेत याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे त्यामुळे बिग बॉस’ ओटीटी सीझन २ मध्ये कोण कोण स्पर्धक आहेत ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. तसेच तुम्हाला हा शो कुठे पाहता येईल ? ते देखील आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. 

कोण आहेत बिग बॉस ओटीटीचे स्पर्धक?

१) फलक नाज
‘बिग बॉस OTT 2’ ची पहिला स्पर्धक फलक नाज आहे. सलमान खानने फलकची ओळख करून दिली. फलकने २४ डिसेंबर २०२२ बद्दल आठवणी सांगताना अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आकस्मिक मृत्यूनंतर तिचे आणि तिच्या कुटुंबाचे जीवन कसं उद्ध्वस्त झाले हे सांगितले. फलक ही शीजान खानची बहीण आहे. शीजन सध्या दक्षिण आफ्रिकेत रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 13’ शोचे शूटिंग करत आहे.

२) जिया शंकर
शोची दुसरी स्पर्धक जिया शंकर आहे जिया १० वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिने अभिनेता रितेश देशमुखसोबत वेड सिनेमात काम केले आहे.

३) अभिषेक मल्हान
शोमधील तिसरा स्पर्धक अभिषेक मल्हान आहे. अभिषेकला फुकरा इंसान म्हणून देखील ओळखले जाते. अभिषेक एक प्रसिद्ध युट्युबर आहे. तो एमसी स्टॅनचा मोठा चाहता आहे.

४) आकांक्षा पुरी
बिग बॉस OTT 2 ची चौथी स्पर्धक आकांक्षा पुरी आहे. आकांक्षा पुरी एक यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. मिका सिंगच्या स्वयंवरमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या आकांक्षाने इतर सर्व मुलींना मागे टाकत मिका सिंगचे मन जिंकले होते.

५) सायरस ब्रोचा
अभिनेता आणि कॉमेडियन सायरस ब्रोचा बिग बॉस OTT 2 मधील पाचवा स्पर्धक आहे. सायरस एक टीव्ही अँकर, थिएटर कलाकार, कॉमेडियन, पॉडकास्टर आणि लेखक आहे.

६) मनिषा राणी
सोशल मीडिया इंफ्लुएंसर मनिषा राणी ही बिग बॉस OTT 2 ची सहावी स्पर्धक बनली आहे. मनिषा राणी इन्स्टाग्रामवर तिच्या फनी व्हिडिओंसाठी प्रसिद्ध आहे. मनिषा ही डान्सर, अभिनेत्री आणि एंटरटेनर आहे.

७) जाद हदीद
जाद हदीद हा एक प्रसिद्ध मॉडेल आहे, ज्याचा जन्म १९८६ मध्ये लेबनॉनमध्ये झाला होता. तो लेबनॉनमध्ये जन्मलेल्या सर्वात श्रीमंत मॉडेलपैकी एक आहे. त्याचसोबत मिडल ईस्टमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा मॉडेल आहे.

८) आलिया सिद्दीकी
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी बिग बॉस OTT 2 ची आठवी स्पर्धक आहे. आलिया सिद्दीकी दोन मुलांची आई आहे. आलियाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवाजुद्दीने सिद्दीकीनेही पाठिंबा दिला आहे.

९) बेबिका धुर्वे
बेबिका धुर्वे ही टीव्ही मालिकांमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ३ वर्षे डेटिस्ट म्हणून काम केले. बेबिका धुर्वेने भाग्यलक्ष्मी या टीव्ही मालिकेतून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले आणि त्यामध्ये ती देविका ओबेरॉयच्या भूमिकेत दिसली.

१०) अविनाश सचदेव
अविनाश सचदेव हा सुप्रसिद्ध अभिनेता आहे, जो टीव्ही शो ‘छोटी बहू’ मध्ये अनेकदा दिसला आहे. अविनाश करिअरपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत कायम चर्चेत राहिला आहे. अभिनेत्री शाल्मली देसाई हिच्याशी २०१५ मध्ये त्याने लग्न केले होते पण २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

११) पलक पुरसवानी
पलक पुरसवानी एक मॉडेल, अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर आहे. ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या टीव्ही शोमध्ये तिने काम केले होते. पलक पुरसवानीने २०१५ मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनेता अविनाश सचदेवसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनीही ‘नच बलिये 9’ या डान्स रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. बिग बॉस ओटीटीमध्ये हे दोघेही एक्स गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड पहिल्यांदा एकत्र आले आहेत.

१२) पुनीत सुपरस्टार
पुनीत सुपरस्टार हा लोकप्रिय सोशल मीडिया इनफ्लुएंसर आहे. त्यांचे खरे नाव पुनीत कुमार आहे. परंतु त्याला चाहते पुनीत सुपरस्टार आणि लॉर्ड पुनीत म्हणून ओळखतात. पुनीत कुमार हा व्यवसायाने कॉमेडियन आहे आणि त्याचे व्हिडिओ खूप लोकप्रिय आहेत. तो इंस्टाग्राम आणि एमएक्स टकाटक सारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. पुनीत कुमार पहिल्यांदाच ‘टिकटॉक’ने हिट झाला होता.

१३) पूजा भट्ट
अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक असलेली पूजा भट्ट या बिग बॉस ओटीटीमधील १३ व्या स्पर्धक आहेत. पूजा भट्टने डॅडी (१९८९) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वडील महेश भट्ट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तेव्हा पूजा अवघी १७ वर्षांची होती. पूजाचा १९९१ मध्ये आलेला ‘दिल है की मानता नहीं’ हा तिच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट होता.

कुठे पाहता येईल शो ?

बिग बॉस’ ओटीटी सीझन २ हा शो तुम्ही जिओ सिनेमावर या APP वर पाहू शकता. विशेष म्हणजे या अँपवर हा शो पूर्णपणे विनामूल्य आहे. यावेळी स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात रँक देण्यात आले आहेत.

या रँकच्या आधारे घरातील सदस्यांना बिग बॉसचे चलन दिले. बाहेरच्या जगाप्रमाणेच अन्न, कपडे आणि रेशनपासून ते बेड आणि बाथरूमच्या सोयीही स्पर्धकांना खरेदी कराव्या लागणार आहेत. यावेळी कुटुंबातील सदस्यांसाठी सर्व काही आव्हानात्मक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *