तुमच्या गावातील ग्रामपंचायत द्वारे गावांमध्ये कोणकोणते योजना सध्या राबवल्या जात आहेत, त्यानंतर त्या लाभार्थ्यांना काय फायदा होत आहे – तसेच त्यांचे लाभार्थी कोण आहेत या सर्व गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेऊ
हि सर्व माहिती आता ऑनलाईन उपलब्ध आहे .त्यासाठी नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला ही सर्व माहिती पाहता येते.
कोणकोणत्या योजनांची माहिती मिळणार – सध्या अनेक गावांमध्ये goat farming गाय गोठा योजना सुरू आहे, विहीर खोदण्यासाठी अनुदान योजना तसेच ज्या गावांमध्ये घरकुल आलेले असतील तर त्या गावांमध्ये घरकुल ची यादी दिसेल. याव्यतिरिक्त देखील आणखी महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांच्या याद्या आपण पाहू शकला
हि सर्व माहिती कशी पहायची
ही माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जा , खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
नरेगा वेबसाईट ला भेट द्या – येथे क्लीक करा
स्टेप १ –
A ) या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम ज्या वर्षाची माहिती पाहिजे ते आर्थिक वर्ष म्हणजेच फायनान्शिअल इयर Financial Year निवडा – त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडा –
B ) त्यानंतर आपला ब्लॉक निवडा , नंतर आपल्या गावाची ग्रामपंचायत निवडा , या सर्व गोष्टी निवडायच्या आहेत त्यानंतर प्रोसिड Proceed या बटनावर क्लिक करायचे आहे
स्टेप २ –
A ) त्यानंतर IPPE या पर्यायांमधील List of work हा पर्याय वर क्लिक करा
B ) त्या नंतर कामाचा वर्ग , Work Status आणि Financial Year निवडा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मधील सर्व कामे तुम्हाला दिसतील