नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे 50 हजार रुपये अनुदानाची दुसरी व तिसरी यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
राज्यातील खूप शेतकरी या कर्जमाफीच्या यादीची वाट पाहत होते. तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी 50000 रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची दुसरी यादी देखील यापूर्वीच प्रकाशित झाली आहे.
तर उर्वरित राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीची वाट पाहत होते. मात्र आता शेतकऱ्यांची ही प्रतिक्षा संपली आहे – कर्जमाफीस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टल वर अपलोड करण्यात आल्या आहेत.
कुठं पाहता येईल यादी ?
मित्रांनो कर्जमाफी च्या याद्या बँकेकडून शासनाला पाठवल्या जातात. शासन स्तरावर याद्यांची व्हेरिफिकेशन केले जाते व अंतिम याद्या पोर्टल वर अपलोड केल्या जातात.
कर्जमाफीच्या याद्या प्रत्येक गावातील सीएससी सेंटर वर पाहायला मिळतील. या याद्या जिल्ह्यानुसार अपलोड केलेल्या असतात.