सर्व शेतकऱ्यांसाठी हि बातमी खूप आनंदाची आहे – कारण पीएम किसान च्या १३ व्या हप्त्याची यादी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे – मात्र अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही
तर बऱ्याच शेतकऱ्यांनी सीएससी सेंटर वर आपली केवायसी केली आहे. मात्र ही ई-केवायसी सक्सेसफुली सबमिट झाली का हे चेक करायला हवं. कारण जर आपली ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली नसेल तर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजना चा तेरावा हप्ता मिळणार नाही.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपली केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सम्मान निधि योजना चे इथून पुढील हप्ते जमा होणार नाही – असे शासनाने सांगितले
असे चेक करा ई-केवायसीचे स्टेटस
केवायसी पूर्ण झाली का ते चेक करण्यासाठी पीएम किसान सम्मान निधि योजना च्या ऑफिशिअल वेबसाईट वरती आपल्या नोंदणीची स्थिती चेक करू शकता. तसेच पीएम किसान सम्मान निधि योजना च्या वेबसाईटवर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
या यादीमध्ये देखील आपले नाव चेक करू शकता. जर आपले पीएम किसान सम्मान निधि योजना यादी मध्ये नाव दाखवत असेल तर पीएम किसान सम्मान निधि योजना तेरावा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल.