50 हजार प्रोत्साहन अनुदान लवकरच होणार जमा – पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

शेतकरी बांधवानो , तुम्ही जर नियमित कर्ज परतफेड करत असाल 50 हजार प्रोत्साहन अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवाना 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभ देण्यात येणार होता.

पात्र शेतकरी बांधवाना 50 हजार प्रोत्साहन लाभ देण्यासाठी शासनाने 1000 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना कार्यक्रम अर्थसाह्य या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच हे पन्नास हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

या संदर्भातील जी आर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर देण्यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना ५० हजार प्रोत्साहन लाभाची आतुरतेने वाट होती त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.

पहा कसा आहे नवीन जी आर ?

ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज थकलेले होते त्यांना कर्ज माफी मिळाली. मात्र जे शेतकरी नियमित कर्ज भरणा करतात त्यांना काय लाभ मिळणार. म्हणून ज्या शेतकरी बांधवानी अल्पमुदतीच्या पिक कर्जाची वेळोवेळी परतफेड केली त्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50 हजार रुपये दिले जाणार अशी घोषणा उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने केली होती.

मात्र हि घोषणा जेंव्हा केली गेली त्यावेळी ठाकरे सरकारला उतरी कळा लागलेली होती त्यानंतर थोड्याच दिवसानंतर ठाकरे सरकार कोसळले. त्यामुळे आता प्रश्न असा पडला होता कि या ५० हजार प्रोत्साहनपर लाभाचे काय होणार ? लाभ मिळेल कि नाही ? असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते.

नंतर आलेल्या शिंदे सरकारने 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभाचा हा निर्णय कायम ठेवला आणि त्या दिवसापासून शेतकरी बांधवाना हे 50 हजार बँक खात्यामध्ये कधी जमा होतील याची आतुरता लागून राहिलेली आहे.

2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार ज्या शेतकरी बांधवानी अल्प मुदत पीक कर्ज घेतलेले असेल आणि त्याची पूर्णपणे परतफेड केली असेल अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.

कधी मिळणार 50 हजार प्रोत्साहन अनुदान ?

50 हजार प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी शासनाच्या वतीने 1000 कोटी रुपयास शासनाने मान्यता दिली असून त्या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलेला असल्याने हि रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

कोणत्या व्यक्तीस मिळणार योजनेचा लाभ ?

जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात अशाच शेतकऱ्यांना या 50 हजार प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.