मित्रानो तुम्हाला माहिती असेल , अर्थसंकल्पात काय झाले त्यापेक्षा काय महाग झाले आणि काय स्वस्त झाले यात सर्वसामान्यांना सर्वाधिक रस असतो ? त्याचबरोबर आयकर सवलतीमध्ये प्रत्येकाचे लक्ष असते.
आयकर सवलत पाच लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढवला आहे, म्हणजे आता सात लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. याशिवाय एलईडी टीव्ही, मोबाईल फोन, खेळणी यासह अनेक वस्तूंच्या किमती खाली आल्या आहेत. सिगारेटचे भाव वाढणार आहेत. खालील यादीमध्ये पहा काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले ?
एलईडी टीव्ही
खेळणी
मोबाइल
कॅमेरा लेन्स
इलेक्ट्रिक वाहने
हिऱ्याचे दागिने
शेती उपकरणे
सायकल
सिगारेट
दारू
छत्री
विदेशी स्वयंपाकघर चिमणी
सोने
परदेशातून येणाऱ्या सोन्या-चांदीच्या वस्तू
प्लॅटिनम
एक्स-रे मशीन
हिरा
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी आकर्षक असेल, अशी अपेक्षा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच होती. एकीकडे टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांपासून रस्त्यावरील विक्रेते आणि मजुरांपर्यंत सर्वच क्षेत्रातील लोकांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला आहे.
एकंदरीत अर्थमंत्र्यांचा 2023-2024 चा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या खिशाला खूप आवडला आहे – त्यांनी 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्त करून जनतेला खूश केले. त्याचबरोबर हिऱ्यांचे दागिने स्वस्त करून महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला.