वाचकांनो तुम्हाला माहिती असेल, रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन परवाना नसेल व आपल्याकडून रस्त्यावर काही दुर्घटना झाल्यास आपल्याला विमा कंपनीकडून वाहनाचा विमा मिळत नाही एवढेच नाही तर , आपल्याला इतरही कायदेशीर बाबींसाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वाहन परवाना असणे अत्यंत आवश्यक आहे.
आजच्या या लेखात आपण तुम्ही एजंटच्या मदतीशिवाय तसेच आरटीओ कार्यालयात न जाता स्वतःहून घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळवू शकता याविषयी जाणून घेणार आहोत