महिलांसाठी केंद्र सरकारची खास योजना – कमी व्याजदरात मिळणार लाखोंचे कर्ज

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने स्री शक्ती योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 लाखांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सहकार्य करार केला आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना दोन लाखांपर्यंत व्याज दरात 0.5 टक्के सवलत मिळेल. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी नोंदणीकृत कंपन्यांना 50 हजारांपासून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. या योजनेसाठी केवळ 5 टक्के व्याजदर आहे.

कर्जासाठी ‘एसबीआय’च्या कोणत्याही शाखेत अर्ज करता येईल. मात्र, त्यासाठी कोणत्याही उद्योगात महिलेची कमीत कमी 50 टक्के मालकी असावी. महिलेच्या नावे उद्योग नसल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच महिलांना 5 लाखांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळेल

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे – 

आधार कार्ड
निवडणूक ओळखपत्र
बँक खात्याचा तपशील
ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक
उद्योगाची कागदपत्रे द्यावी लागतील