आजपासून मिळणार 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट – पहा कसे करता येईल डाउनलोड

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हि बातमी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झाले आहेत. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात होणार आहे. विद्यार्थ्यांना आजपासून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहे.

बोर्डाच्या www.mahahssscboard.in या संकेतस्थळावर सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांसाठी हॉलतिकीट उपलब्द होणार आहेत – college login मध्ये जाऊन उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट प्रिंट करुन द्यावीत, असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.

असे डाउनलोड करा हॉल तिकीट

सर्वप्रथम बोर्डाचे अधिकृत https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर जा.
त्यांनतर ‘डाउनलोड महाराष्ट्र एचएससी हॉल तिकीट 2023’ ही लिंक ओपन करा.
यानंतर महा एचएससी 12 वी हॉल तिकीट हा पर्याय निवडा.
तुमचे एचएससी हॉल तिकीट पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर, नाव किंवा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख टाकून एंटर करा.
त्यानंतर तुमचे हॉल तिकीट ओपन होईल त्यानंतर आपले हॉल तिकीट डाऊनलोड करा.