केंद्र सरकारची मोठी घोषणा – वन्य प्राण्यापासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी मिळणार अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या मॅसेज मध्ये आपण पाहणार आहोत वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणत्या कोणत्या योजनांचा प्रारंभ केला आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल , शेती करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वन्य प्राण्यांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे जंगले तोडल्यामुळे जंगले छोटी झाली आहेत त्यामुळे वन्य प्राण्यांना मनासारखे राहता येत नाही. यामुळे ते अनेक वेळा मानवी वस्तीत घुसून किंवा शेतात घुसून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात थांबतात त्यामुळे अनेकदा वन्य प्राण्यांचा हल्ल्याही त्यांच्यावर होतो – दरम्यान आता शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने खास योजना सुरू केली आहे.

वन्य प्राण्यांमुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जनविकास योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या 75 टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान मिळेल तर बाकीचे 25% रक्कम शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागेल.

या योजने करिता आवश्यक कागदपत्रे – 

अर्ज सातबारा व 8 – अ उतारा.

जातीचा दाखला.

अर्ज कुठं करायचा –

विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थितपणे भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सर्वांग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा अर्ज चा नमुना आपल्याला कृषी विभाग पंचायत समितीकडे मिळून जाईल.