केव्हा जमा होणार पी एम किसान योजनेचा १३ वा हप्ता – जाणून घ्या सविस्तर

सर्व शेतकऱ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – पी एम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याची ची तारीख आलेली आहे तेराव्या हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळणार होते. यामध्ये आता शासनाकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे चला तर पाहूया काय आहे तारीख

तसे तुम्हाला माहिती असेल , या योजनेमधून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान दिले जाते ज्यामध्ये चार महिन्याला प्रति दोन हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून ट्रान्सफर केली जाते.

या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते त्यातून ते शेताला लागणारा अधिक खर्च किंवा स्वतःसाठी हे पैसे वापरू शकतात. आता लवकरच पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे.

पी एम किसान योजनेचा ( पी एम किसान योजना १३ वा हप्ता 2023 ) तेरावा हप्ता हा मार्च 2023 च्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शासनाकडून आलेल्या माहितीनुसार – तेराव्या हप्त्याचे पैसे हे 17 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक ज्या शेतकऱ्यांनी इ केवायसी केली नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही – असेही शासनाने जाहीर केले आहे