शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी – राज्यात ऐन थंडीच्या दिवसात अनेक भागात पडणार मुसळधार पाऊस

येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे.
महाराष्ट्रात कशी असणार हवामान स्थिती ?   


राज्यात सातत्यानं हवामानत बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या हवामानातील चढ-उताराचा नागरिकांना त्रास होत आहे.
तसेच याचा शेती पिकांवर देखील मोठा परिणाम होताना दिसत आहे. अशातच हवामान विभागाकडून 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान, राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
यामध्ये विशेषतः राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करुन दिली आहे.
प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हे हवामान अपडेट खूप महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून , इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा