पोलीस भरतीची वाट राज्यातील तरुण मागील तीन वर्षपासून पाहत आहेत , पोलिस भरती होणार अशी माहिती राज्यातील अनेक नेत्यांनी दिली आहे – मात्र भरती केंव्हा होणार हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे , दरम्यान आज 24 तारिखला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ,राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करणार अशी घोषणा केली आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले – देवेंद्र फडणवीस विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे , त्यामुळे राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

 

 

याव्यतिरिक्त आणखी सात हजार – फडणवीस यांनी सांगितले मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याव्यतिरिक्त आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे , त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ,मात्र त्यांनी पोलिस भरतीची तारीख जाहीर नाही केली

तसेच आता एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले आहे

पोलीस भरती विषयीची हि माहिती महत्वाची आहे , आपण हि महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *