तुम्हाला माहिती असेल यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ,भारतात केंद्र सरकारतर्फे अमृत महोत्सवी वर्ष साजरं होणार आहे . या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून देशभरात एक मोहीम राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला .

यानुसार 18 वर्षांपुढील असे नागरिक, ज्यांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत .त्यांना मोफत बुस्टर डोस साठी निर्णय घेतला आहे . केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे

पहा काय म्हणाले अनुराग ठाकूर ?

अनुराग ठाकूर यांनी सांगितले आपल्या देशात आतापर्यंत 199 कोटींपेक्षा जास्त कोरोना लसीकरण केले आहे. याआधी देशातील नागरिकांकडून बूस्टर डोससाठी शुल्क घेतले जात होते – तर फ्रंटलाइन वर्कर्स आणि कोव्हिड वॉरिअर्स किंवा 60 वर्षांपुढील नागरिकांसाठी हा बुस्टर डोस मोफत दिला जात होता.


दरम्यान 18 वर्षा पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना डोस मोफत मिळणार कि विकत घ्यावा लागणार असा प्रश्न पडला होता – मात्र आज केंद्राची बैठक झाली , या बैठकीत झालेल्या निर्णयनुसार देशात आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लशीचा बुस्टर डोस मोफत मिळणार आहे


बुस्टर डोस का देत आहेत – तुम्हाला माहिती असेल सुरुवातीला कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यात अँटीबॉडीजचं प्रमाण कमी होऊ लागतं. आणि बूस्टर डोस घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढते. आयसीएमआर आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रांच्या संशोधनातून देखील हि माहीती समोर आली आहे त्यामुळे आता देशातील 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी मोफत बुस्टर देण्याचा मोठा निर्णय़ देशातील केंद्र सरकारने घेतला आहे


मोफत बुस्टर डोस कधीपासून मिळणार – 18-59 या वयोगटातील नागरिकांना मिळणार हा मोफत बूस्टर डोस 15 जुलैपासून नागरिकांना उपलब्ध होईल – असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे
NOTE – 15 जुलैपासून 75 दिवस बुस्टर डोस साठी विशेष मोहीम संपूर्ण देशभरात राबवण्यात येईल – ज्यात 18 वर्षांवरील सर्वांना खासगी लसीकरण केंद्रावर देखील कोरोना लशीचा तिसरा म्हणजे बुस्टर डोस दिला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *