जून महिना विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. या निकालाची कमालीची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे. महाराष्ट्र 12 वी निकाल 2022 बुधवार 8 जून ला जाहिर होणार असल्याचं महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून घोषित करण्यात आलं आहे. निकाल 8 जून ला दुपारी 1 वाजता
12 वी प्रमाणे 10 वीचाही निकाल वेळेत लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं – दरम्यान 10 वीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लावणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं , बारावीचा निकाल तुम्ही खालील बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळ म्हणजे www.mahahsscboard.in वर पाहायला
बोर्डाचा बारावीचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे
सर्वात आधी महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्या
यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल – तुमच्या निकालाची प्रत छापून ती तुमच्याकडेच ठेवा
रिझल्ट चेक करताना महत्त्वाच्या बाबी
सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली – तर अशा परिस्थितीत सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येईल
बारावीचा निकाल चेक करण्यासाठी इतर वेबसाईट