स्वस्त कार खरेदी करणे कठीण होणार – कारण वाहन कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवत आहेत – अशातच आता टाटा मोटर्सने भारतात आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे – इनपुट कॉस्ट किमतींची भरपाई करण्यासाठी , कंपनीने नवीन दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

तर टाटा मोटर्सने दिलेल्या माहिती प्रमाणे – टाटाच्या नेक्सॉन, पंच, टियागो, अल्ट्रोज सफारी, हॅरियर,आणि टिगोर या सर्व कारच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत – तर टाटा मोटर्स ने या प्रकारच्या मॉडेल आधारावरील कारच्या किमतीत सरासरी 1.1 टक्क्यांनी वाढ केली आहे – तसे पाहिले तर टाटा मोटर्सच्या वाहनांमध्ये चांगली विक्री होत आहे – गेल्या 6 महिन्यांत कंपनीने 2.2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे –

टाटा मोटर्सने वाहनांच्या किमती वाढवण्याची – यावर्षातील ही पहिली वेळ नाही – 2022 मधील कंपनीची ही तिसरी दरवाढ आहे – यापूर्वी कंपनीने इलेक्ट्रिक प्रवासी वाहनाच्या किमतीत वाढ केली – कंपनीने Tata Nexon आणि Tigor EV या दोन्हींच्या किमतीत सुधारणा केल्यामुळे , कारच्या कींमती 25 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत – याआधी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने त्यांच्या कारच्या किमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ केली होती.

नवीन दरवाढ केंव्हा लागू होणार – टाटा मोटर्सने दिलेल्या माहिती प्रमाणे – आता लागू झालेली 1.1 टक्क्यांची दरवाढ २३ एप्रिल २०२२ पासून लागू होणार – यापुढे वाहने नवीन किमती नुसार मिळतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *