क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड धारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक आणि क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड देणाऱ्या कंपन्यांसाठी नवीन नियमावली जारी केली – सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे

पहा कशी आहे नियमावली ?

तसे तुम्हाला माहिती असेल कोणतेही कार्ड बंद होण्यास अनेकदा विलंब होतो, त्यामुळे ग्राहकांना काही वेळा मोठा दंड भरावाही लागतो – मात्र रिझर्व्ह बँकेच्या नियमवलींने सर्व बँकेच्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे

कारण आता ग्राहकांच्या विनंतीवरून क्रेडिट आणि डेबिट कार्ड 7 दिवसांच्या आत बंद करणं बंधनकारक असेल – आणि सर्वात महत्वाचे असं न केल्यास, 7 दिवसांनंतर,

बँकेला ग्राहकांना दररोज 500 रुपये दंड द्यावा लागेल. यासोबतच बँकेला क्रेडिट आणि डेबिट कार्ड बंद झाल्याची माहिती – आता ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीवर लवकरात लवकर पाठवावी लागेल.

तसेच महत्वाचे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने एक वर्ष क्रेडिट कार्डचा सतत वापर केला नाही – तर बँकअशा ग्राहकाचे कार्ड बंद करू शकते. परंतु, असं करण्यापूर्वी बँक ग्राहकाला माहिती देईल – असे स्पस्ट करण्यात आले आहे

म्हणजे आता मेसेज पाठवल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहक प्रतिसाद देत नसेल – किंवा क्रेडिट कार्ड वापरत नसेल, तर अशा स्थितीत बँक त्या ग्राहकांचं क्रेडिट कार्ड बंद करू शकनार

हे सर्व नियम कधी लागू होतील – हे सर्व नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत

हे नियम कोणत्या बँकांना लागू होतील – भारतीय रिजर्व्ह बँकेने जारी केलेले हे सर्व नियम सार्वजनिक क्षेत्रातील बँका – तसेच बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना सुद्धा पाळावे लागतील. – त्याचबरोबर इतर राज्यातील राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पेमेंट बँकांना ही हे नवीन मार्गदर्शक तत्त्व लागू होणार

सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील हि माहिती शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *