बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर – शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगी नंतर बैलगाडी शर्यती सुरु झल्या असल्या तरी – आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे – आणि तुम्हाला जर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करायचे असेल तर या नियमावली माहिती असणे खूप आवश्यक आहे – आजच्या मॅसेज मध्ये आपण बैलगाडी शर्यतीच्या नियमावली समजून घेऊ
सदर नियमावली शासनाकडून कृषी, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग , पशुसंवर्धन तसेच मंत्रालय यांच्याकडील अधिसूचनेनुसार – सर्व आयोजकांसाठी तयार करण्यात आली आहे
बैलगाडी शर्यतीची नियमावली कशी आहे
नवीन नियमानुसार आता बैलांचा छळ करण्यास मनाई आहे , तसेच त्यांना उत्तेजक द्रव्य देण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. – सर्वात महत्वाचे म्हणजे बैलगाडी शर्यतीसाठी आता एक हजार मीटरच्या अंतराचीही अटही ठेवण्यात आली आहे – तसेच बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
तसेच आता बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यासाठी – आयोजकांना स्पर्धेसाठी पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे – तसेच बैलावर काठी, चाबूक अशा कुठल्याही प्रकारच्या वस्तूचा वापर करण्यावर मनाई – असेही नियमावलीत सांगण्यात आले आहे
तसेच स्पर्धेच्या ठिकाणी पशु रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे – तसेच आता शर्यतीचे चित्रीकरण करून उप विभागीय अधिकाऱ्यास सादर करणे बंधनकारक असेल – आणि नव्या नियमावलीनसर , आता आधी ठरलेल्या गाडीवानालाच सहभागी होण्याची परवानगी असेल
महत्वाचे म्हणजे आता केवळ नव्या नियमावलीनुसार बैलगाडा शर्यतीचं आयोजन करावं लागणार – आणि यातील कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल – तसेच अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे
बैलगाडा शर्यतीसाठी नियमावली जाहीर झाली – शेतकऱ्यांसाठी हि महत्वाची बातमी आहे – आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा