राज्यात पुढील चार दिवस होणार पाऊस – हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

राज्यात पुढील चार दिवस होणार पाऊस – हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

_Mazi Batmi – Morning Updates_*

राज्यात मागील काही दिवसापासून उष्णतेची मोठी लाट येत आहे , आणि अशातच आता हवामान विभागाने आता पुढील चार दिवस पाऊसाचा इशारा दिला आहे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे – २३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा आहे – यात गोवा, कोकण ,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे – तसे पहिले तर सध्या विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली – तर तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात किंचित वाढ झाली आहे

२१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाट वातावरण राहील.

दरम्यान आता वरिष्ठ शास्त्रज्ञ हवामानशास्त्र विभाग , कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे – २१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच पाऊस पडणार आहे

या जिल्ह्यात पडणार पाऊस ?

२१ आणि २२ एप्रिल ला – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, सांगली, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे

तर २३ एप्रिल ला – नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर , तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडणार आहे

📞 जाहिराती साठी संपर्क – 7299700600

🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा माझी बातमीला 👉 http://mazibatmi.com

Leave a Reply

Your email address will not be published.