महाराष्ट्र राज्यातील सोसायटी मध्ये राहणाऱ्यांसाठी हि खूप महत्वाची बातमी आहे – तसे तुम्हाला माहिती असेल घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय आहे.

मात्र आता पर्यंत एक वेगळीच पद्धत होती , ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपले घर विकायचे असेल – आपण राहत असलेल्या सोसायटीची परवानगी घेणे आवश्यक होते – या पद्धत मध्ये घर विकण्याची प्रोसेस खूप लांब होत होती , आणि घर ज्या तारिखला विकायचे होते ,त्या तारिखला विकणे शक्य नव्हते . आणि यामुळे घर किंवा फ्लॅट चे मालक आणि ज्यांना घर विकत घ्यायचे असते , या दोघांनाही समस्या निर्माण होत होती . त्यामुळे जर एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल – तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले

आणि त्यांनी हि जुनी पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला नवीन पद्धतीनुसार घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर सोसायटीच्या कोणत्याही परवानगीची काहीच गरज राहणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा – १२ एप्रिलला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे

या निर्णयानंतर राज्यात आता फ्लॅट विकताना – सोसायटीच्या NOC ची गरज राहणार नाही – दरम्यान महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय खूप महत्वाचा आहे – आपण थोडासा वेळ काढून , राज्यातील सर्व नागरीकांना देखील अवश्य शेअर करा

Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – जॉईन व्हा माझी बातमीला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *