तसे तुह्माला माहिती असेल IRDA म्हणजेच Insurance Regulatory and Development Authority हि भारत सरकारची संस्था सर्व विमा कंपन्यांवर लक्ष्य ठेऊन असते
त्यामुळे कोणत्याही विमा कंपनीने तुमचा क्लेम नाकारला किंवा फ्रॉड केला तर तुम्ही त्या विरोधात IRDA च्या माध्यमातून तक्रार करू शकता
कशी करता येईल तक्रार ?
● IRDA ने दिलेल्या माहितीनुसार – सर्वप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवावी लागेल – या तक्रारीवर तुम्हाला 15 दिवसात योग्य उत्तर न मिळाल्यास तुम्ही याविरोधात IRDA कडे तक्रार नोंदवू शकता
● IRDA कडे तक्रार नोंदवण्यासाठी co[email protected] या ईमेल आयडीवर तक्रार दाखल करता येईल
● तसेच जर तक्रार केल्यानंतर त्यावर काहीही तोडगा निघाला नाही – तर तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार करू शकता
विमा लोकपाल म्हणजे काय ?
● विमा लोकपाल हा विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यात समन्वय साधतो तसेच हा व्यक्ती कागदाच्या आधारे क्लेमची रक्कम देखील निश्चित करू शकतो
● जर इन्शुअर व्यक्ती क्लेम रकमेस सहमत असेल तर ऑर्डर पास केली जाते – यानंतर कंपनीला 15 दिवसांच्या आत त्याचे पालन करावे लागते.
● यानंतर मग लोकपाल जो निर्णय सुनावतो – जो विमा कंपनीला स्विकारावा लागतो – असे IRDA ने सांगितले
दरम्यान कोणत्याही विमा कंपनीने – क्लेम फेटाळल्यास तक्रार करता येते , हि माहिती विमा धारकांसाठी नक्कीच महत्वाची आहे , आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील शेअर करा