विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे – आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेशकुमार यांनी याबाबतची घोषणा केली.

💁🏻‍♀️ पदव्या कश्या घेता येतील ?

🔰 यानिर्णयामुळे विद्यार्थी एका विद्यापीठातून बीए करताना , दुसऱ्या विद्यापीठातून बी. कॉम़ करू शकतील – म्हणजेच दोन वेगवेगळय़ा विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे शिक्षण एकाचवेळी घेता येईल

🔰 आयोगाने दिलेल्या माहिती प्रमाणे दोन्ही अभ्यासक्रम शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेऊन करता येतील – यामध्ये एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष आणि एक ऑनलाइन किंवा दोन्ही ऑनलाइन पद्धतीने करता येतील

🔰 तसेच दोन विद्यापीठे करार करून अभ्यासक्रम, तसेच परीक्षा यांच्या वेळांबाबत समन्वय साधूनही विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतील,

🔰 या दरम्यान प्रवेशाचे नियम, हजेरीचे नियम, वेळापत्रक हे ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांना असतील असेहि डॉ. जगदेशकुमार यांनी सांगितले.

👌 *आता विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येतील* – हि माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला 👉 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *