तुम्हाला माहिती असेल, आता सातबारा आणि फेरफार उतारे सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहायचे याची सविस्तर माहिती आपण या मॅसेज मध्ये जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
तसे तुम्हाला माहिती असेल, जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करायचा असल्यास त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास आपल्याला माहिती असणे अत्यंत म्हत्वाचे असते. आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय ? तर ती जमीन कोणाच्या नावावर होते ? आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात नेमके काय बदल होत गेले ? याची सविस्तर माहिती आपल्याला असणे फार गरजेचे आहे.
जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, ही माहिती आपणास कुटून मिळत असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख कार्यालय किंवा सातबारा उतारा खाते तसेच फेरफार उतारा या पत्रिकांमध्ये नमूद करण्यात आलेली असते.