सरकारच्या मदतीने सुरू करा पेपर कप व्यवसाय आणि दर महिन्याला कमवा 75 हजार रुपये
जर तुम्ही कमी गुंतवणुकीच्या व्यवसायाची कल्पना शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुम्ही डिस्पोजेबल पेपर कप बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.
तुम्हाला माहिती असेल, प्लॅस्टिकवरती बंदी घालण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे कागदी कप व्यवसायाला मोठी भरारी आली आहे. यामुळे या व्यवसायाला सरकार कडूनही मदत केली जाते. डिस्पोजेबल पेपर कपची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यूसची दुकानेही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेले कागदी ग्लास वापरत आहेत. चहाची दुकाने सुद्धा लहान कप वापरतात. त्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता.
प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यासह प्रदूषण दूर करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने अनेक उपाय योजना करत आहे. अशा प्रकारे केंद्र सरकारकडून तुम्हाला मुद्रा लोन योजेच्या माध्यमातून लोन घेता येणार, या व्यवसायात तुम्हाला 75 टक्के रक्कम मुद्रा योजनेअंतर्गत मिळेल म्हणजे तुम्हाला फक्त 25 टक्के खर्च स्वत:ला करावा लागेल
पहा किती येईल खर्च ?
तुम्ही फक्त एकाच प्रकारचा कप किंवा ग्लास बनवण्याची मशीन विकत घेतली तर तुम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कप बनवण्याची मशीन विकत घ्यायची असेल, तर तुम्हाला 8-10 लाख रुपये मोजावे लागतील.
रंग मशिनचा सुमारे दीड लाखांचा खर्च येणार आहे. म्हणजेच 10-12 लाख रुपये मशिनवर खर्च केले जातील आणि सुमारे 15 लाख रुपये भांडवल म्हणून मिळतील ज्यामध्ये कच्चा माल, दुकानाचे भाडे, पगार आणि वीज बिले यांचा समावेश असेल. जर तुम्हाला हि मशीन विकत घ्यायची असेल तर तुम्ही इंडिया मार्ट वेबसाइटवरून घेऊ शकता
कमाई किती होणार ?
सुरुवातीला या व्यवसायातून तुम्ही वार्षिक 9 लाख रुपये कमवू शकता, म्हणजेच प्रत्येक महिन्याला 75,000 रुपये तुम्ही आरामात कमवू शकता.
Leave a Reply