आता पडीक जमीन भाड्याने देऊन कमवा भरपूर पैसे – पहा कशी आहे राज्य सरकारची हि योजना

आता पडीक जमीन भाड्याने देऊन कमवा भरपूर पैसे – पहा कशी आहे राज्य सरकारची हि योजना

 

आता पडीक जमीन भाड्याने देऊन कमवा भरपूर पैसे – पहा कशी आहे राज्य सरकारची हि योजना

तसे तुम्हाला माहिती याआधी सुद्धा आपण याविषयी माहिती घेतली होती – दरम्यान या मॅसेज मध्ये आपण या योजनेसाठी पात्रता कशी असेल ? आणि या योजनेसाठी अर्ज कुठं करायचा याविषयी जाणून घेऊ.

सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. तसेच शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल,अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2022’ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना एक एकरमागे 75 हजार रुपये देणार असल्याचे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, दिवसा 12 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. यासाठी ॲग्रीकल्चर फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. यावर्षी 30 टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. तर पुढील दोन वर्षात उर्वरित फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळू शकेल.

कोणती जमीन घेतली जाणार भाड्याने ?

यासाठी सर्वात आधी सरकारी पडीक जमिनीचा उपयोग करण्यात येईल. याशिवाय फिडरजवळ असलेल्या शेतात काही पिकत नसेल तर अशी शेतजमीन देखील 30 वर्षे भाड्याने घेण्यात येईल.

दरम्यान या जमिनीची मालकी शेतकऱ्याचीच असेल. 30 वर्षानंतर शेतकऱ्याला हि जमीन परत दिली जाईल. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळू शकेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top